असावे भलतिये व्यापारी |
लक्ष सर्वेश्वरी ठेवोनिया || - संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज
(You may become a Business Tycoon, but, never forget Social Good.)
(Meaning of Social Entrepreneurship explained by Saint Namdev 750 years back….)
दहा वर्षापूर्वी माझे सदगुरु, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत कै. श्री बाळासाहेब भारदे (दादा) यांनी मला
‘उपेक्षितांचा प्रतिनिधी हो’ असा सल्ला दिला. थोरामोठ्यांचा सल्ला उमजायला आपल्याला अनेक वर्षे लागतात, कारण त्यांच्या शब्दातच त्यांच्या अनुभवाच ' सार ' दडलेलं असतं...एखाद्या मंत्राप्रमाणे....