eduvarta eduvarta bizvarta vipvarta samajone
भूमिका

असावे भलतिये व्यापारी | 
लक्ष सर्वेश्वरी ठेवोनिया  ||  - संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज

(You may become a Business Tycoon, but, never forget Social Good.)
(Meaning of Social Entrepreneurship explained by Saint Namdev 750 years back….)

नमस्कार,

दहा वर्षापूर्वी माझे सदगुरु, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत कै. श्री बाळासाहेब भारदे (दादा) यांनी मला 'उपेक्षितांचा प्रतिनिधी हो' असा सल्ला दिला. थोरामोठ्यांचा सल्ला उमजायला आपल्याला अनेक वर्षे लागतात, कारण त्यांच्या शब्दातच त्यांच्या अनुभवाच ' सार ' दडलेलं असतं...एखाद्या मंत्राप्रमाणे....

गेली ५ वर्षे मी व माझे सहकारी माहितीपासून वंचित व उपेक्षित जनसामान्यांचे 'माहितीतून परिवर्तन' साधण्यासाठी अथक परिश्रम घेत आहोत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त अशी अचूक व दर्जेदार माहिती Local SMS Community Newsletter द्वारे देत आहोत. या सेवेचा फायदा ५ राज्यातील ७ लाखाहून अधिक नागरिक घेत आहेत. याच अनुभवाच्या बळावर आता Info Alerts सुरु करतो आहोत.

ग्रामीण भागात सेवा देताना असे लक्षात आले कि मेसेज वाचणारे हे प्रामुख्याने युवक आहेत. आपण कुठेही गेलात तरी युवकांची एकंदरीत ‘सामाजिक वृत्ती’ कमी झालेली आढळून येईल. युवक हे जास्तच आत्मकेंद्रित होऊ लागले आहेत. कारण स्पष्ट आहे,  त्यांच्याच शहरातील चुलत भावाला महिन्याला ३०-४० हजार पगार मिळतो व यांना २ हजार रुपये मिळवताना नाकी नउ येतात. हि दरी वाढतच आहे. शहरातील भावाला, आपला गावाकडचा भाऊ, चुलतभाऊ आता आपला वाटत नाही. हा मोठा सामाजिक तिढा सगळीकडे निर्माण झाला आहे. आपलंच पोट भरत नाही,  मग समाजाचा व देशाचा विचार कोण करणार ?  एवढं असूनही ग्रामीण भागातला युवक हा जास्त सामाजिक आहे. घरातील सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हाच युवक मुख्य दुवा असतो. या युवकांच्या स्वताच्या अशा काही समस्या असतात... त्या सोडविन्याच्या दृष्टिने आम्ही युवक हे केंद्रबिन्दु मानुन Info Alerts सेवा सुरु केल्या आहेत.

योग्य करियर गायडंस न मिळाल्यामुळे अनेक युवक ३-४ वर्षे शिकूनही काहीही काम करत नाहीत. त्यांना अवतीभोवती कोणीही मार्गदर्शक नसतो. बिचारे आई-वडील शेतात राबत असतात व अडाणी (अल्पशिक्षित) असल्यामुळे मुलांनी काय करावे याचे मार्गदर्शन त्यांनाही करता येत नाही. अशा युवकांची करियर गायडंस, शैक्षणिक संधी, स्पर्धा परीक्षा, इ. ची मागणी होती. व ती पुरी करण्यासाठीच आम्ही eduVARTA हि सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

बेरोजगारीचा प्रश्नही तेवढाच ज्वलंत आहे. म्हणून या युवकांना विविध व्यवसायसंधी समजाव्यात म्हणून bizVARTA हि सेवा सरू केली आहे.

युवा कार्यकर्त्यांसाठी vipVARTA सुरु करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यातून ते अपडेट राहतील व गावाच्या भल्यासाठी काम करतील. vipVARTA हि फक्त विधायक माहिती पुरविणारी सेवा आहे.

अनेक युवकांना स्वत:च्या समाजासाठी असलेल्या योजना व सवलतींची माहितीच नसते. कुठला अर्ज,  कुठ भरायचा, त्याची अंतिम तारिख काय,  हे काहिही माहिती नसते. त्यामुळे हे युवक शासकिय योजना व सवलतींपासुन वंचित राहतात. अशा युवकांसाठी SamajONE ही सेवा फारच लाभदायक ठरेल.

आपण जर आपल्या युवकांना योग्य दिशा व त्यांच्यातील सुप्त शक्तिचा योग्य वापर केला नाही तर ......वाईट शब्दात सांगायचे तर ..... नक्षलवाद आपल्या घरापासुन फार दुर नाही.

अनेकांच्या स्वप्नातिल '२०२० मध्ये भारत एक महासत्ता'  स्वप्नवतच राहिल, जर आपण युवकांच्या धगधगत्या प्रश्नांचा विचार केला नाही तर...आणि भारताला महासत्ता बनायचे असेल तर ग्रामिण व निमशहरी भागातील उपेक्षित व दुर्लक्षित युवकांना विश्वासात घेउन   मुख्य प्रवाहात आणावे लागेल. अन्यथा त्यांच्यावर केले जाणारे दुर्लक्ष आपल्याला महागात पडेल.

अशा या युवकांच्या समस्या जाणुन व त्यांच्या मागणीनुरुप सुरु केलेल्या सेवेमध्ये आपण मला आपल्या परिने सहकार्य कराल, हि अपेक्षा.

आपला सहकारी

रवी घाटे
(राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेता)
पुणे.

Featured in:
Follow us on: