
SMSONE देत असलेल्या सेवा महाविद्यालयीन विद्यार्थी, सुशिक्षित - स्वयंरोजगार करु इच्छीणारे युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच कुटुंबप्रमुखांसाठी अत्यंत गरजेच्या आहेत.
आमचा फोकस हा कायमच ग्रामीण भाग राहिलेला आहे. शहरातील विद्यार्थ्याना व नागरिकांना कुठल्याही प्रश्नावर - अडचणीवर लगेचच मार्गदर्शन मिळते. कारण त्यांना जाणकार व तज्ञ मंडळी जवळच उपलब्ध असतात. ग्रामीण भागात तसे नसते. एक तर आई-वडील अल्पशिक्षित असतात, दुसरं म्हणजे कुठला जाणकार अवतीभोवती नसतो. आपल्याला जो काही एखादा शहाणा माणूस माहिती असतो, त्यालाच आपण ग्रेट समजतो. व त्याच्या सल्ल्याने वागतो. पण हा सल्लागार तरी स्वताला अद्ययावत ठेवत असतो का? तर नाही. आणि म्हणून विद्यार्थी पदवीधर जरी झाले तरी त्यांना नक्की काय करावे हे कळत नाही. आणि असा युवक ना शेतात काम करतो, ना त्याला नोकरी मिळते. त्याची अवस्था त्रिशंकू होते. मग तो चावडीवर बसून राजकारणाच्या गप्पा मारण्यात आपला वेळ घालवतो किंवा स्थानिक राजकारण्याचा सांगकाम्या बनतो. आई - वडिलांचे कष्टाने कमविलेले हजारो रुपये व स्वत:च्या जीवनातील उमेदीचा काळ वाया घालवतो. हे विदारक चित्र संपूर्ण राज्यात दिसते.
म्हणूनच शिकून मोठे झालेल्या तुम्हा सर्वांना आमचे कळकळीचे आव्हान आहे, की आपण जर या युवकांना आपल्या स्वत:च्या ज्ञान क्षेत्रातील (Expertise) योग्य मार्गदर्शन केले तर हे युवक त्यापासून बोध घेतील. ते अधिक माहिती मिळवतील. त्यांना काहीतरी दिशा सापडेल.
आपण सतत ऑनलाईन असता. आपण ज्या विषयात / क्षेत्रात प्राविण्य मिळविले आहे, अशा संदर्भाचा प्रश्न आल्यास आपण त्या प्रश्नकर्त्याला समर्पक उत्तर देऊन त्याच्या शंका कुशंका दूर करून त्याच्या जीवनाचा मार्ग सुकर करू शकता.
कृपया आपल्या अधिकृत इमेल आयडी वरून आम्हाला आपले प्रोफाईल पाठवा किंवा LinkedInची लिंक पाठवा. आम्ही आपणास काही वेळातच आपले अधिकृत ONLINE VOLUNTEERम्हणून मान्यता देऊ. व त्यानंतर आपण प्रश्नकर्त्यांना उत्तरे देऊ शकता.
आपणास या सामाजिक प्रकल्पामध्ये सहभागी झाल्याबद्दल SMSONE व Seeds of Empowerment (A Spin-off of Stanford University ) या संस्थेकडून Certificate of Participation देऊन आपला सन्मान केला जाईल.या .... आपल्या ज्ञानातून …. अधिक ज्ञानसंपन्न समाज घडवूयात ……
